राजर्षी शाहू स्मारक भवनमधील सांस्कृतिक सभागृहाचे उद्या होणार उद्घाटन...

<p>राजर्षी शाहू स्मारक भवनमधील सांस्कृतिक सभागृहाचे उद्या होणार उद्घाटन...</p>

कोल्हापूर – शहरातील राजर्षी शाहू स्मारक भवनमधील सांस्कृतिक सभागृहाच्या नूतनीकरणाचे काम गेल्या पाच महिन्यांपासून सुरू होते. शेवटच्या टप्प्यातील किरकोळ कामे सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. राजर्षी शाहू मेमोरियल ट्रस्टकडे व्यवस्थापन असणाऱ्या या भवनात चारशे, दोनशे चाळीस आणि ५० आसन क्षमतेची तीन सभागृहे आणि एक ग्रंथालय आहे. पंधरा वर्षांपूर्वी या सभागृहाचे नूतनीकरण करण्यात आले होते. मात्र सततच्या वापरामुळे चारशे आसन क्षमतेच्या सभागृहाची थोडी दुरवस्था झाली होती. त्यामुळे शाहू मेमोरियल ट्रस्टने प्राधान्यक्रमाने मुख्य सभागृहाच्या डागडुजीचे आणि आधुनिकीकरणाचे काम पाच महिन्यापूर्वी हाती घेतले होते. सध्या मुख्य सभागृहातील अंतर्गत आसन व्यवस्था अधिक आरामदायी करण्यात आली आहे. अत्याधुनिक प्रकाश योजना त्याचबरोबर आधुनिक ध्वनी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. मुख्य सभागृहातील रंगमंचाचा विस्तार, कलाकारांच्या रंगभूषा कक्षाची दुरुस्ती, नवीन खिडक्या, दरवाजे, याचबरोबर विश्रामगृहातील खोल्यांची डागडुजी करण्यात आली आहे. शाहू स्मारक भवनचे रुपडे पालटले असून उद्या राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत नूतनीकरण केलेल्या इमारतीचे उद्घाटन करण्यात येणार आहे.