रविकिरण इंगवले यांचा शिवसेना (उबाठा ) जिल्हाप्रमुख पदाचा तडकाफडकी राजीनामा

<p>रविकिरण इंगवले यांचा शिवसेना (उबाठा ) जिल्हाप्रमुख पदाचा तडकाफडकी राजीनामा</p>

कोल्हापूर – शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी आज आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला.  त्यामुळे उलट – सुलट चर्चांना उधाण आले आहे.
रविकिरण इंगवले यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावे पत्र लिहून राजीनामा दिला आहे. त्यांनी पत्रात म्हटले आहे कि, “गेली दहा वर्षे मी दोन वेळा शहर प्रमुख आणि सध्या जिल्हाप्रमुख म्हणून कार्यरत आहे कोणतेही राजकीय विश्लेषण न करता मी माझ्या जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा देत आहे”


काही दिवसांपूर्वी शहर प्रमुख मंजित माने यांचा कॉल रेकॉर्ड व्हायरल झाला होता. त्यावेळी इंगवले आणि माने यांच्यातील पक्षाबाबतची  खदखद दिसून आली होती. याचबरोबर शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्याबरोबरही त्यांचे खटके उडाले होते. आधीच पक्षामध्ये बंडाळी आणि त्यात पक्षातील राजीनामा नाट्यामुळे काय पक्षात घडत आहे..? याची दखल वरिष्ठ पातळीवर घेतली जाणार का हे पहावे लागणार आहे.