अंबाबाई मंदिराबाबतचा ‘तो’ व्हिडीओ बनावट...संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी 

<p>अंबाबाई मंदिराबाबतचा ‘तो’ व्हिडीओ बनावट...संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी </p>

कोल्हापूर – ‘राधा रमण दास’ या एक्स हेडलवर अंबाबाई मंदिरात बीफ घेऊन आल्या प्रकरणी पूजकांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तो व्हिडीओ बनावट असल्याची तक्रार  करवीर निवासिनी अंबाबाई हक्कदार श्रीपुजक मंडळच्या वतीने जुना राजवाडा पोलिसात करण्यात आली आहे.   
तक्रारी म्हटले आहे कि, एक्स या समाज माध्यमातील राधा रमण दास या अकाउंट वरून एक पोस्ट प्रसारित करण्यात आली आहे. कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिरात काही अन्य धर्मातील लोक बीफ घेऊन आल्यामुळे आणि काही धार्मिक घोषणा दिल्यामुळे तेथील श्री पूजकांनी मारहाण केली अशा पद्धतीचा मजकूर त्यामध्ये दिला असून त्यामध्ये कोल्हापुरातील ज्योतिबा डोंगर मंदिर येथे काही दिवसापूर्वी घडलेल्या वादग्रस्त प्रसंगाचा व्हिडिओ प्रसारित करण्यात आला आहे यामुळे समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण होऊन शांतता व सुव्यवस्था बिघडू शकते.
तरी या घडलेल्या प्रकाराचा तातडीने शोध घेऊन संबंधित व्यक्तींवर कारवाई करणे आवश्यक आहे तसेच संबंधित एक्स पोस्ट डिलीट करून  संबंधित पोस्टकर्त्यावर कारवाई करण्यासाठी मागणी करण्यात आली आहे.