पेट्रोल - डिझेल दरात तिसऱ्यांदा वाढ... सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री

<p>पेट्रोल - डिझेल दरात तिसऱ्यांदा वाढ... सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री</p>

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काटकसरीचे आवाहन केल्यानंतर आज तिसऱ्यांदा पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ करण्यात आली आहे त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागली आहे.
 
सर्वप्रथम 15 मे रोजी पेट्रोलच्या दरात 3 रुपये आणि डिझेलच्या दरात 3.11 रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर लगेच  20 मे रोजी  पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दुसऱ्यांदा वाढ झाली. त्यानंतर आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तिसऱ्यांदा वाढ झाली आहे. त्यानुसार पेट्रोलचा प्रतिलीटर दर 87 पैसे आणि डिझेलची प्रतिलीटर किंमत 91 पैशांनी वाढले आहे. 
आगामी काळात खनिज तेलाचे दर वाढून पेट्रोलियम कंपन्यांचा तोटा कायम राहिल्यास पेट्रोल आणि डिझेलचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. सध्या बुलढाणा, जळगाव आणि वाशिममध्ये पेट्रोल आणि डिझेल मिळत नसल्याने पेट्रोल पंपांवर रांगाच रांगा लागल्या आहेत. 

मुंबई 
पेट्रोल- 108.45
डिझेल-95.02
परभणी 
पेट्रोल- 110.45 पैसे
डिझेल- 97.02
कोल्हापूर 
पेट्रोल- 109.30
डिझेल-  95.89
भंडारा 
109.60 (पेट्रोल नवा दर)
96.18 (डिझेल नवा दर)