शिवाजी विद्यापिठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ.के.आर. यादव यांचे निधन 

<p>शिवाजी विद्यापिठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ.के.आर. यादव यांचे निधन </p>

कोल्हापूर - शिवाजी विद्यापिठाचे माजी प्र-कुलगुरू आणि न्यू कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ. के. आर. तथा कृष्णराव रामचंद्र यादव यांनी आज सकाळी १० च्या सुमारास पुणे येथे अखेरचा श्वास घेतला. यावेळी त्यांचे वय ९० वर्ष होते. त्यांच्या निधनाने सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे. उद्या २४ मे रोजी सकाळी १० वाजता पंचगंगा स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.