कुंभी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी सरदार पाटील यांची बिनविरोध निवड

<p>कुंभी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी सरदार पाटील यांची बिनविरोध निवड</p>

कोल्हापूर - कुडित्रेतील कुंभी, कासारी कारखान्याचे उपाध्यक्ष राहुल खाडे यांनी आपल्या उपाध्यक्ष पदाचा नियमानुसार राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. त्यामुळे या रिक्त पदाच्या निवडीसाठी आज विशेष सभा बोलविण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी साखर सहसंचालक गोपाळ माळवे होते. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष आमदार चंद्रदीप नरके यांची प्रमुख उपस्थिती होती. सरदार पाटील यांचा उपाध्यक्ष पदासाठी एकच अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे सरदार पाटील यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. निवडीनंतर पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. या प्रसंगी अॅड. बाजीराव शेलार, अनिष पाटील, विलास पाटील, राहूल खाडे, विश्वास पाटील, दादासाहेब लाड, रवींद्र मडके यांनी मनोगते व्यक्त केली.

यावेळी संचालक पी. डी. पाटील, संजय पाटील, प्रकाश पाटील, उत्तम वरुटे, डॉ.प्रा.बी. बी. पाटील, किशोर पाटील, अनिल पाटील, बळवंत करचे, वसंत आळवेकर, राऊ पाटील, सर्जेराव हुजरे, धनश्री पाटील, प्रमिला पाटील, कृष्णात कांबळे, युवराज शिंदे, तानाजी पाटील, सुरेश काटकर, सेक्रेटरी प्रशांत पाटील, कार्यकारी संचालक धिरजकुमार माने उपस्थित होते.