समर्थकांनी घाईघाईने कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नये : कॉकरोच जनता पार्टीच्या संस्थापकांचं आवाहन
नवी दिल्ली – 'कॉकरोच जनता पार्टी'चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी इन्स्टाग्रामवर एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे. ज्या त्यांनी, "मला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे की, काही जण कॉकरोच जनता पार्टीच्या नावाने निदर्शने करत आहेत. मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, आपण कुठल्याही आंदोलनाची घोषणा केलेली नाही आणि आपण आता आंदोलन करणार नाही”, असे म्हटले आहे.
कॉकरोच जनता पार्टीच्या सर्व समर्थकांना विनंती आहे की, घाईघाईने असा कुठलाही निर्णय घेऊ नका, ज्यामुळे आपल्या चळवळीवर परिणाम होईल. सरकारला आपण एक चूक करावी, हेच हवं आहे. त्यामुळे आपण तसं करु नये. ही मोठी लढाई आहे आणि आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे."
"आज काही ठिकाणी लोक आंदोलने करणार आहेत, मात्र त्यात आपला काहीही संबंध नाही. ज्या लोकांना आपल्यापासून त्रास होत आहे, ते लोक मुद्दामून अशा कृत्यांनी आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे म्हटले आहे.