कु. अनुष्का कृष्णात जमदाडे व हर्षला विजय पाटील यांची राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड...

<p>कु. अनुष्का कृष्णात जमदाडे व हर्षला विजय पाटील यांची राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड...</p>

कोल्हापूर -  वारणानगर येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाच्या खेळाडू  कु. अनुष्का कृष्णात जमदाडे आणि हर्षला विजय पाटील (12 वी. विज्ञान) यांची पुद्दूचेरी येथे सुरू असलेल्या ज्युनियर (१८ वर्षांखालील) राष्ट्रीय अजिंक्यपद बास्केटबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या मुलींचा संघात निवड झाली आहे. २२ मे पासून सुरू झालेली स्पर्धा २७ मे २०२६ पर्यंत चालणार आहे.

नाशिक येथे झालेल्या राज्यस्तरीय ज्युनियर (१८ वर्षांखालील) आंतरजिल्हा बास्केटबॉल स्पर्धेमधून दोघींची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.

या खेळाडूंना वारणा विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे,  मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही. व्ही. कार्जिन्नी, वारणा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एम शेख, उपप्राचार्य ए. एम. अतिरकर, वारणा बास्केटबॉल क्लबचे सचिव उदय जाधव यांचे प्रोत्साहन लाभले. यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाचे क्रीडाशिक्षक सुहास कंदूरकर, क्रीडा मार्गदर्शक तिरु, उदय पाटील, रोहित घेवारी आणि संग्राम दळवी यांचे मार्गदर्शन लाभले.