हे फेक अकाउंट…: सुषमा अंधारेंची पोस्ट
मुंबई – माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सुषमा अंधारे यांच्याबाबत एका फेक अकाउंटवरून अपशब्द वापरण्यात आले आहे. यावर सुषमा अंधारे यांनी खुलासा करत, राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री या संबंधाने काही पावलं उचलतील, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
सुषमा अंधारे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे कि, हे फेक अकाउंट आहे याची मला कल्पना आहे. पण चालवणारा निश्चितच कोणीतरी घाणीतला किडा आहे. या राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री या संबंधाने काही पावलं उचलतील अशी आपण अपेक्षा करूया. अकाउंट कुणाचं आहे हे खूपच लवकर कळेल...
सत्यासाठी जेव्हा तुम्ही अत्यंत प्रामाणिकपणे आणि त्वेषाने लढत असता त्यावेळेला आपला आत्मा सुद्धा हादरून जाईल, असे हल्ले होणे हे स्वाभाविक आहे.
या पोस्टच्या निमित्ताने एवढेच समजून घेऊया की, आपलं राज्य जे कधीकाळी छत्रपती शिवराय, जिजाऊ, रमाई, सावित्री यांचा आदर्श सांगणारे राज्य आजघडीला सत्ताधारी कोणत्या दिशेने नेत आहेत.