सुनील तटकरेंमुळे झिशान सिद्दीकींच्या अडचणीत वाढ...
मुंबई – काही दिवसांपूर्वी झिशान सिद्दीकी यांनी आमदारकीची शपथ घेतली आहे. परंतु ही त्यांची आमदारकी अडचणीत आली आहे. आ. सिद्दीकी यांच्या एबी फॉर्मवर प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील तटकरे यांनी सही केली आहे. त्यामुळे त्यांची अडचण वाढली आहे.
२९ एप्रिल रोजी निवडणूक आयोगाला पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या सहीने देण्यात आलेल्या पत्रात सुनील तटकरे यांच्या नावासमोर प्रदेशाध्यक्ष पदाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यामुळे ३० एप्रिल रोजी झिशान सिद्दीकी यांच्या AB फॉर्मवर सुनील तटकरे यांनी केलेल्या सहीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.