विजय मुख्यमंत्री झाल्याची बातमी जेव्हा माझ्या कानावर...: अभिनेत्रा  रजनीकांत यांची पहिली प्रतिक्रिया

<p>विजय मुख्यमंत्री झाल्याची बातमी जेव्हा माझ्या कानावर...: अभिनेत्रा  रजनीकांत यांची पहिली प्रतिक्रिया</p>

चेन्नई – तमिळनाडू विधानसभा निवडणुकीमध्ये टीव्हीके पक्षाने विजय मिळवल्याने जोसेफ विजय मुख्यमंत्री झाले आहेत. यावर माध्यमांसमोर येत सुप्रसिद्ध अभिनेता रजनीकांत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

“विजय मुख्यमंत्री झाल्याची बातमी जेव्हा माझ्या कानावर आली, तेव्हा मला खरोखरच मोठा धक्का बसला. मी आता राजकारणात सक्रिय नाही. राजकारणापासून दूर जाऊन मला आता अनेक दिवस झाले आहेत. माझ्या आणि विजयच्या वयात २८ वर्षांचं अंतर आहे. तमिळनाडूतील दोन बलाढ्य राजकीय पक्षांसमोर आव्हान उभं करत विजयने स्वतःच्या हिंमतीवर ही ओळख आणि यश मिळवलं आहे,” असे ते म्हणाले आहेत.