‘या’ ज्येष्ठ अभिनेत्रीने शासकीय पुरस्कार परत करताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली दखल
मुंबई – पुण्यातील जमिनीचा टीडीआर शासनाकडून मिळत नसल्याने, ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार शासनाला परत केला आणि त्यांनी यातून शासनाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती. या नाराजीची दखल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. त्यामुळे ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्र शासनाकडून त्यांना मिळालेला व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार त्यांनी ठाण्यातील आनंद आश्रम याठिकाणी येत आनंद दिघे यांच्या प्रतिमेसमोर परत केला. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची आपण भेट घेणार असल्याचे म्हटले होते. त्यानुसार त्यांनी फोनवरून उषा चव्हाण यांच्याशी संवाद साधला आणि त्यांची अडचण सोडवली आहे.