वर्चस्ववादातून दोघांना मारहाण... चौघांना अटक

<p>वर्चस्ववादातून दोघांना मारहाण... चौघांना अटक</p>

कोल्हापूर – वर्चस्ववादातून काही तरुणांनी दोघांना बांबूने बेदम मारहाण केली आहे. या मारहाणी प्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.

शहरातील दौलतनगर येथे स्नेहल संजय चौगले राहतात. बुधवारी रात्री स्नेहल चौगले आणि ऋषिकेश चौगले हे त्यांच्या मोटारमधून माऊली पुतळा येथे गेले होते. यावेळी याठिकाणी आलेल्या काही तरुणांनी वर्चस्ववादातून, दोघांना बांबूने बेदम मारहाण केली तसेच त्यांच्या वाहनाचीही तोडफोड करून नुकसानही केले होते. या प्रकरणी स्नेहल चौगले यांनी सात   जणांविरोधात, राजारामपुरी पोलीसात फिर्याद दिली होती.

त्यानुसार पोलिसांनी माऊली पुतळा परिसरात राहणाऱ्या योगेश नलवडे, सुरज दिंडे, रुतेश कुन्हाडे आणि गुरुनाथ कुन्हाडे या चौघांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.