छत्रपती शिवाजी जलतरण तलावात बुडून शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू

<p>छत्रपती शिवाजी जलतरण तलावात बुडून शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू</p>

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी जलतरण तलावात पोहण्यासाठी गेलेल्या एका शाळकरी मुलाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी घडली. अभिनंदनकुमार राजेशकुमार सिंह (वव १५) असे मृत मुलाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मूळचे बिहार येथील असलेले राजेशकुमार सिंह हे गेल्या काही वर्षांपासून कुटुंबीयांसह कोल्हापूर शहरात वास्तव्यास आहेत. त्यांचा मुलगा अभिनंदनकुमार हा दहावीत शिक्षण घेत होता. आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास तो छत्रपती शिवाजी स्टेडियम येथील जलतरण तलावात पोहण्यासाठी गेला होता. यावेळी पाण्यात बुडाल्याने त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.