पुण्यात रंगणार सहावा सुपरहिट ‘मराठी फिल्म फेस्टिव्हल’

<p>पुण्यात रंगणार सहावा सुपरहिट ‘मराठी फिल्म फेस्टिव्हल’</p>

पुणे - मराठी चित्रपटसृष्टीतील वैविध्यपूर्ण कथा, नव्या विचारांची मांडणी आणि सर्जनशीलतेचा उत्सव साजरा करणारा लोकप्रिय मराठी फिल्म फेस्टिव्हल यंदा पुन्हा एकदा पुण्यात रंगणार आहे. रेड एफएम आयोजित या महोत्सवाचे सहावे पर्व २२ ते २४ मे या दरम्यान पुण्यातील ई-स्क्वेअर, शिवाजीनगर येथे पार पडणार आहे.  

 यंदाच्या महोत्सवात समकालीन चित्रपटांसोबतच काही अजरामर क्लासिक चित्रपटांचे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये  ‘जैत रे जैत’, ‘तिघी’, ‘गोंधळ’ आणि ‘दशावतार’ या चित्रपटांचा समावेश आहे. याशिवाय विविध पॅनेल डिस्कशन्स, दिग्दर्शक आणि कलाकारांशी संवाद तसेच प्रादेशिक कथाकथनाच्या बदलत्या प्रवाहांवर विशेष चर्चासत्रही आयोजित करण्यात आले आहे. या सोहळ्याला महेश मांजरेकर, अमृता सुभाष, गिरीश कुलकर्णी, शिवराज वायचळ, सिद्धार्थ जाधव यांच्यासह मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार उपस्थित राहणार आहेत.