आ.सतेज पाटील यांच्याकडून अभ्यासिकेच्या कामाची पाहणी... 

<p>आ.सतेज पाटील यांच्याकडून अभ्यासिकेच्या कामाची पाहणी... </p>

कोल्हापूर - आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या फंडातून सुमारे चार कोटी रुपये खर्चून शहराच्या उपनगरामध्ये विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका उभारणीचे काम हाती घेण्यात आले होते. यातील सानेगुरुजी वसाहत परिसरातील अभ्यासिकेचे काम यापूर्वीच पूर्ण झाले आहे. सध्या जीवबा नाना जाधव पार्क नजीकच्या पोद्दार इंग्लिश मीडियम स्कूल जवळ उभारण्यात येत असलेल्या अभ्यासिकेच्या आणि
तुळजा भवानी कॉलनीमधील आपटे नगर येथील अभ्यासिकेच्या कामाची आज आ. सतेज पाटील यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी, लवकरच या अभ्यासिकांचे बांधकाम पूर्ण करून या अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी खुल्या करा, अशा सूचना ठेकेदारांना दिल्या. 

यावेळी महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते इंद्रजीत बोंद्रे,विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, नगरसेविका जयश्री कांबळे, माजी नगरसेवक राजू दिंडोर्ले, अमोल माने, नंदू पिसे, विजय कांबळे, बाबा कोरडे, अभिजीत देठे, डॉक्टर महादेव मोरे, विलास आंबोळे, महादेव वेटाळे, सुयोग मुगदूम यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.