‘या’ ठिकाणी ‘दहीवडा’ खाल्ल्याने २७ मुलांसह ५८ जणांना सुरु झाल्या उलट्या.... राज्य सरकारकडून चौकशीचे आदेश
भुवनेश्वर – ओडिशा राज्यातील जाजपूर जिल्ह्यात दहीवडा खाल्ल्याने अनेकांची तब्येत बिघडल्याची घटना घडली आहे त्यामुळे खळबळ उडाली आहे. दहीवडा खाल्ल्याने लगेच अनेकांना उलट्या आणि तापासारखी लक्षणे जाणवू लागली यामध्ये २७ मुलांसह ५८ जणांची तब्येत बिघडली आहे.
या अचानक झालेल्या प्रकारामुळे गावात घबराट पसरली आहे. सर्व बाधितांना तातडीने जवळच्या वैद्यकीय केंद्रात हलवण्यात आले आहे. या घटनेनंतर राज्य सरकारने विविध यंत्रणांमार्फत चौकशी सुरू केली आहे.