बारामतीत सुनेत्रा पवार तर राहुरीत अक्षय कर्डिलेंची विजयी घोडदौड सुरु...

<p>बारामतीत सुनेत्रा पवार तर राहुरीत अक्षय कर्डिलेंची विजयी घोडदौड सुरु...</p>

पुणे – आज राज्यातील बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. यावेळी बारामतीतून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि राहुरीतून भाजपचे अक्षय कर्डिले आघाडीवर आहेत. त्यामुळे यांचा विजय निश्चित असल्याचे चित्र दिसून येत आहे. 
बारामती पोटनिवडणुकीत सातव्या आणि आठव्या फेरीत सुनेत्रा पवार चांगल्या मतांनी आघाडीवर आहेत. यामध्ये आठव्या फेरीत सुनेत्रा पवार यांना 8 हजार 725 मते मिळाली असून आठव्या फेरी अखेर पवार यांना 70 हजार 642 मते मिळाली आहेत. तसेच चौथी फेरीत, अभिजित बिचुकले यांना 33 आणि करुणा मुंडे यांना 51 मते पडली आहेत. याप्रमाणे राहुरीमध्ये अक्षय कर्डिले यांना आतापर्यंत ३३ हजार २२२ इतकी मते मिळाली आहेत.