तामिळनाडूत 'थलपती विजय' यांचा जलवा तर बंगालमध्ये ममता बॅनर्जींची अडचण
चेन्नई – आज देशातील पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकीचे निकाल हाती येत आहेत. त्यानुसार तामिळनाडूत सत्ताधारी DMK आणि AIADMK या दोन्ही पक्षाला अभिनेता 'थलपती विजय' च्या TVK पक्षाने मागे टाकत आघाडी मिळवली आहे त्यामुळे थलपती विजय यांची विजयाची वाटचाल सुरु झाली आहे. तर पश्चिम बंगालमध्ये भाजपने १९१ जागा मिळवत आघाडी मिळवली आहे तर ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसची पिछाडी झाली असून ९८ जागा मिळवली आहेत. पुद्दुचेरीमध्ये मुख्यमंत्री एन. रंगास्वामी यांच्या एनडीएने २६ जागा मिळवले आहेत त्यामुळे पुन्हा एनडीएचे सरकार येणार हे निश्चित झाले आहे.
आसाममध्ये भाजपचे मुख्यमंत्री डॉ. हिमंता बिस्वा सरमा यांची सत्ता कायम राहणार असे चित्र दिसून येत आहे त्यानुसार भाजपने ९९ तर काँग्रेसने २४ जागा मिळवल्या आहेत तर केरळमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखाली युडीएफ पक्षाने बाजी मारत ९६ जागा मिळवल्या आहेत तर एलडीएफ पक्षाला ४२ जागा मिळाल्या आहेत.