ब्रह्माकुमारीज तर्फे मुलां- मुलींसाठी स्क्रीन पासून मुक्ती - मनाची शांती 
समर कॅम्पचे आयोजन

<p>ब्रह्माकुमारीज तर्फे मुलां- मुलींसाठी स्क्रीन पासून मुक्ती - मनाची शांती <br />
समर कॅम्पचे आयोजन</p>

कोल्हापुर- प्रजापिता ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्व विद्यालयातर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मुलांसाठी उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 5 ते 9 मे दररोज सायं. 5 ते 7 या वेळेत ब्रह्माकुमारीज पीस पॅलेस, शिवाजी पेठ, कोल्हापूर या ठिकाणी हे शिबिर संपन्न होणार असून  8 ते 16 वयोगटातील मुला- मुलींसाठी आपले भविष्य उज्वल करण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे. आत्मविश्वास, एकाग्रता, डिजिटल संतुलन, नैतिक मूल्य अशा अनेक विषयांवर मनोरंजक गोष्टींच्या माध्यमातून प्रकाश टाकला जाणार आहे. मुलांमधील कलागुणांचा विकास साधण्यासाठी मुलांकडून विविध ऍक्टिव्हिटीज ही करून घेतल्या जाणार आहेत. हे शिबिर विनामूल्य असून इच्छुक पालकांनी आपल्या पाल्यांची नावे लवकरात लवकर ऑनलाईन किंवा शिवाजी पेठेतील सेवा केंद्रामध्ये प्रत्यक्ष येऊन नोंदवावीत, असे आव्हान ब्रह्माकुमारीज सेवाकेंद्राच्या संचालिका, सुनंदा दीदी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 7499951328 या नंबरवर संपर्क साधावा.