लक्ष्मीबाई जरग विद्यालयातील अभ्यासिकेच्या कामाची आ.सतेज पाटील यांच्याकडून पाहणी
कोल्हापूर – आ. सतेज पाटील यांच्या सहकार्यातून माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या फंडातून कोल्हापूर शहरातील उपनगरांमध्ये गरजू विद्यार्थ्यांसाठी चार ठिकाणी अभ्यासिका उभारणीचे काम हाती घेण्यात आले होते. यापैकी सानेगुरुजी वसाहत परिसरातील एका अभ्यासिकेचे काम पूर्ण झाले आहे तर पोद्दार स्कूल, आपटे नगर आणि जरगनगर विद्यालय येथील अभ्यासिकांचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे.
आज आमदार सतेज पाटील यांनी जरगनगर येथील लक्ष्मीबाई जरग विद्यालय येथे सुरू असलेल्या अभ्यासिकेच्या बांधकामाची पाहणी केली. यावेळी आमदार पाटील यांनी स्थानिक नगरसेवकांशी चर्चा केली. तसेच अभ्यासिकेच्या कामातील त्रुटी दूर करून बांधकाम लवकर पूर्ण करण्याच्या सूचना महापालिकेचे अधिकारी आणि ठेकेदारांना दिल्या आहेत.
यावेळी कोल्हापूर महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते इंद्रजीत बोंद्रे, विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, स्थानिक नगरसेविका सुषमा जरग, अमर समर्थ, विशाल गवळी, जिल्हा परिषद सदस्य संग्राम पाटील, संतोष जरग, प्रशांत जरग वैभवी जरग, संदीप कदम, शितल नलवडे, सुजित देसाई, स्वप्निल कलकुटकी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.