कॉ. गोविंद पानसरे यांच्या विचारांवर आधारित 'लीडर' या पुस्तकाचे प्रकाशन
'लीडर' हे पुस्तक नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आणि ऊर्जेचा स्त्रोत ठरेल : आ. सतेज पाटील
कोल्हापूर – नव्या पिढीसाठी 'लीडर' हे पुस्तक प्रेरणादायी आणि ऊर्जेचा स्त्रोत ठरेल, असा विश्वास आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला. मुस्लिम बोर्डिंग येथे कॉ. गोविंद पानसरे यांच्या विचारांवर आधारित 'लीडर' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी बोलताना खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी, कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी तळागाळातील कष्टकऱ्यांसाठी आपले संपूर्ण जीवन व्यथीत केले. त्यांचे विचार विद्यार्थी वर्गापर्यंत पोहचण्यासाठी नव्या पिढीला नक्कीच लीडर हे पुस्तक उपयुक्त ठरेल असे त्यांनी सांगितले. यावेळी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे सचिव भालचंद्र कांगो यांनी बोलताना ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी विचारवंत भक्त निर्माण करण्याचे काम केले असे प्रतिपादन केले.
स्मिता पानसरे यांनी, गोविंद पानसरे ही एक व्यक्ती नव्हती तर विचारधारा होती, कृतिशील नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात असल्याचे त्यांनी सांगतिले. यावेळी लेखक उमेश सूर्यवंशी यांनी देखील मनोगत व्यक्त लिडर पुस्तकाची माहिती दिली. ज्येष्ठ पुरोगामी नेते स्वर्गीय कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांचे विचार उमेश सूर्यवंशी लिखित लीडर या पुस्तकातून मांडण्यात आले आहे.
या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला कॉम्रेड दिलीप पोवार, सुभाष लांडे, एस बी पाटील, महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, कॉम्रेड रघुनाथ कांबळे, संभाजीराव जगदाळे, प्राचार्य टी एस पाटील, रवी जाधव, ऋषिकेश पाटील यांच्यासह डाव्या चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते.