आम्ही आज त्या पुस्तक वाचनाला जाणार आहोत...: आ. संजय गायकवाड

<p>आम्ही आज त्या पुस्तक वाचनाला जाणार आहोत...: आ. संजय गायकवाड</p>

बुलढाणा – आज आ. संजय गायकवाड यांच्या विरोधात बुलढाण्यात पुरोगामी संघटना आंदोलन करत आहे. यावर आ. गायकवाड यांनी, आम्ही आज त्या पुस्तक वाचनाला जाणार आहोत. आम्ही तिकडे जाऊन खाली बसू आणि विनयशीलतेने सगळं ऐकून घेऊ, असे त्यांनी  पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

 आ.संजय गायकवाड यांनी म्हटले आहे कि, पुस्तकवाचनावेळी जर त्यांनी महाराजांचा योग्य सन्मान केला तर आम्ही टाळ्या वाजवून त्यांच्या स्वागत करु.  त्या पुस्तकात 300-400 वेळा शिवाजी, शिवाजी असे लिहिले आहे, त्यांनी वाचनावेळी प्रत्येक ठिकाणी शिवाजी महाराज म्हणावे. आमच्या सगळ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला आणि शिवभक्तांच्या भावांना अनावर झाल्या तर याची सगळी जबाबदारी त्या पुस्तक वाचनाच्या आयोजकाची आणि पुस्तक वाचणाऱ्याची असेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.