विविध मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर रेशन बचाव समितीचा मोर्चा 

<p>विविध मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर रेशन बचाव समितीचा मोर्चा </p>

कोल्हापूर - रेशन बचाव समितीच्यावतीने  विविध मागण्यांसाठी आज दसरा चौकातून  कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर  मोर्चा काढण्यात आला.

प्रत्येक शिधापत्रिका धारकाला दरमहा पाच जीवनावश्यक वस्तू सवलतीच्या दरात देण्यात याव्यात, शिधापत्रिकेवर दरमहा पाच लिटर रॉकेल आणि पाचशे रुपयात गॅस सिलेंडर मिळावा, रेशन कार्डची उत्पन्न मर्यादा 2 लाख करण्यात यावी, या मागण्यांसाठी हा  मोर्चा काढण्यात आला.

या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर  आंदोलन तीव्र करण्याचा  इशारा रवींद्र मोरे यांनी दिला आहे. यावेळी रेशन बचाव समितीच्यावतिने  जिल्हाधिकारी विजय राठोड  यांना निवेदन देण्यात आले आहे. या मोर्चात राजेश मंडलिक, श्रीपती पाटील,आनंदा लादे,संदीप लाटकर, संदीप पाटील,पांडुरंग सुभेदार,आबु बारगीर,महादेव बोडके,नाना उलपे, राजेंद्र कारंडे,साताप्पा शेणवी यांच्यासह रेशन बचाव समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले  होते.