प्रशांत आंबींना पोलिसांनी केलं स्थानबद्ध...पुरोगामी संघटना आक्रमक
बुलढाणा – बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्या घरावर पुरोगामी संघटनेच्यावतीने आंदोलन करण्यात येणार असल्याचे प्रशांत आंबी यांनी सांगितले होते. या पार्श्वभूमीवर आज पोलिसांनी प्रशांत आंबी यांना स्थानबद्ध केले आहे. त्यामुळे पुरोगामी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
पोलीस आंबी यांना स्थानबद्ध करण्यासाठी आले असताना पोलीस आणि आंबींच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी बाचाबाची झाली. यावेळी घोषणाबाजी देत कार्यकर्त्यांनी पोलिसांना विरोध केला. परंतु अखेर पोलिसांनी आंबींना स्थानबद्ध केल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले होते.