पुण्यातील सीआयडी ऑफिसमध्ये आ. रोहित पवार पोहचले पण...
पुणे – माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघात प्रकरणी आ. रोहित पवार आज पुण्यातील सीआयडी ऑफिसमध्ये गेले होते. त्यावेळी त्यांना अधिकारी भेटलेच नाहीत त्यामुळे त्यांचा संताप झाला आहे.
यावेळी आ. रोहित पवार यांनी, अजित पवारांच्या अपघात प्रकरणी तपासात गांभीर्य दिसत नसल्याचा आरोप अधिकाऱ्यांवर केला आहे. अधिकाऱ्यांना क्रिकेट मॅचमुळे वेळ नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.