तेवीस लाखांच्या दागिन्यांवर मोलकरणीने मारला डल्ला  

<p>तेवीस लाखांच्या दागिन्यांवर मोलकरणीने मारला डल्ला  </p>

कोल्हापूर – शहरातील राजारामपुरी दुसऱ्या गल्लीत डॉ स्नेहा निगडे या कुटुंबियांसमवेत राहतात. डॉ.  निगडे यांचे  टाकाळा परिसरात श्रीराम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. डिसेंबर 2025 ते एप्रिल 2026 या  कालावधीत राजेंद्रनगर परिसरात राहणारी शबाना आरब ही डॉ. निगडे यांच्या घरी आणि हॉस्पिटलमध्ये  मोलकरीण म्हणून काम करत होती. चार महिन्यांच्या  कालावधीत आरब हिने डॉ निगडे यांचे घर  आणि हॉस्पिटलमधून सोन्याचे दागिने, सोन्या चांदीचे पूजेचे साहित्य असा तेवीस लाखाचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी डॉक्टर निगडे यांच्या फिर्यादीवरून शबाना आरब हिच्या विरोधात राजारामपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.