धक्कादायक : बँक कर्मचाऱ्यांच्या निष्ठूर वागण्यामुळे भावाने बहिणीचा सांगाडाच आणला बँकेत... 

<p>धक्कादायक : बँक कर्मचाऱ्यांच्या निष्ठूर वागण्यामुळे भावाने बहिणीचा सांगाडाच आणला बँकेत... </p>

पटना – ओडीसा राज्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. बँक कर्मचाऱ्यांच्या निष्ठूर वागण्यामुळे एका भावाने बहिणीचा सांगाडाच  चक्क बँकेत आणला. त्यामुळे पटना जिल्ह्यातील दियानाली गावकऱ्यांसह बँक कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.
गेल्या काही दिवसांपासून जितू मुंडा हे आपल्या मृत बहिणीच्या खात्यातून 20 हजार रुपये काढण्यासाठी अधिकाऱ्यांकडे अनेकदा परवानगी मागत होते. यासाठी त्यांनी बँकेच्या कर्मचाऱ्यांना बहिणीच्या मृत्यूची माहिती तसेच  संबंधित कागदपत्रं सादर केली. परंतु वारंवार विनंत्या करून देखील त्याचं काम झालं नाही. कोणत्याही व्यवहाराला मंजुरी देण्यासाठी खातेदाराची प्रत्यक्ष उपस्थिती अनिवार्य असल्याचे अधिकाऱ्यांनी जितू यांना सांगितले. बहीण समोर आल्याशिवाय आम्ही काहीही करु शकत नाही असेही अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले. 
अखेर वैतागून जितु यांनी  मृत बहिणीचा  सांगाडा कबरीमधून बाहेर काढला आणि तो सोबत घेऊन स्थानिक ग्रामीण बँकेत गेले. सांगाडा बहिणीचा खरोखर मृत्यू झाला आहे हे पटवून देण्यासाठी थेट बँकेच्या आवारात सांगाडा ठेवल्यानंतर एकच खळबळ उडाली. सुमारे दोन महिन्यांपूर्वी दफन करण्यात आलेला आपल्या बहिणीचा सांगाडा कबरीतून बाहेर काढला आणि निषेध नोंदवण्यासाठी तो सांगाडा बँकेत आणला. त्याच्या या कृतीने स्थानिक नागरिक आणि बँक अधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. बँक कर्मचाऱ्यांच्या निष्ठूर वागण्यामुळे पैशांसाठी त्याला तोच मृतदेह बाहेर काढावा लागला.
या सर्व घटनेनंतर पटना पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. आपल्या हक्काचे पैसे काढण्यासाठी स्वत:च्याच बहिणीचा सांगाडा अशाप्रकारे बँकेत आणावा लागल्याने अनेकांनी संबंधिक बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.