बुलढाण्यात पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलन काढलं मोडीत...

<p>बुलढाण्यात पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलन काढलं मोडीत...</p>

बुलढाणा – आज बुलढाण्यात प्रशांत आंबी यांच्यासह पुरोगामी संघटनेचे कार्यकर्ते आंदोलनासाठी आ. संजय गायकवाड यांच्या घरापासून अर्धा किलोमीटरवर असलेल्या जिजामाता प्रेक्षागार मैदानावर जमले होते. यावेळी  'शिवाजी कोण होता?' या  पुस्तकाचे वाचन करण्यासाठी आलेल्या आंदोलकांना पोलिसांनी बळाचा वापर करून ताब्यात घेतले आणि  आंदोलन मोडीत काढले. 

यावेळी आमदार गायकवाड यांच्या नावाचे फलक हाती घेऊन निदर्शने केली. तसेच मैदानावरच प्रशांत आंबी यांनी  पुस्तक वाचण्यास सुरुवात करणार इतक्यात अप्पर पोलीस अधीक्षक श्रौणिक लोढा, उपअधीक्षक सुधीर पाटील आदी वरिष्ठ पोलिस अधिकारी वाहने आणि  फौज फाट्यांसह आंदोलन स्थळी दाखल झाले. आम्ही शांततेत पुस्तक वाचन करुन नियमांचे पालन करु, असे सांगू पाहणा-या आंदोलनकर्त्यांचे काहीएक ऐकायला पोलीस अधिकारी तयार नव्हते. यावेळी आंदोलकांमध्ये महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. परंतु पोलिसांनी बळाचा वापर करून हे आंदोलन दडपले.