व्यावसायिक सिलेंडरधारकांसाठी खुशखबर..!

<p>व्यावसायिक सिलेंडरधारकांसाठी खुशखबर..!</p>

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून गॅस सिलेंडरच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्यांसह व्यावसायिक सिलेंडरधारक मेटाकुटीला आले आहेत. परंतु आजपासून व्यावसायिक सिलेंडर स्वस्त झाला आहे. त्यामुळे व्यावसायिक सिलेंडरधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.  
घरगुती सिलेंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आला नसून व्यावसायिक सिलेंडर १८३.५० रुपयांनी स्वस्त झाला आहे.