चित्रपट महामंडळ निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा ; ५७ लाख खर्च, घोटाळ्याचे आरोप - सुशांत शेलार, धनाजी यमकरांचे प्रत्युत्तर
मुंबई - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महामंडळात आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण तापले असून अभिनेता सुशांत शेलार आणि माजी उपाध्यक्ष धनाजी यमकर यांनी पत्रकार परिषद घेत माजी अध्यक्ष विजय पाटकर यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप केलेत.
सुशांत शेलार यांनी ‘मानाचा मुजरा’ या कार्यक्रमासाठी साधारण १५ ते २० लाख खर्च अपेक्षित असताना तब्बल ५७ लाखांचा खर्च दाखवण्यात आल्याचा आरोप केला. तसेच १० लाख ७८ हजार ५९३ रुपयांचा घोटाळा झाल्याचाही दावा त्यांनी केला. न्यायालयात दावा दाखल झाल्यानंतर विजय पाटकर यांचे सदस्यत्व रद्द झाले असल्याने अपात्र असताना त्यांना अर्ज कसा भरता येतो, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. “जर कुठल्या मंत्र्यांचा दबाव असेल, तर संबंधितांची नावं जाहीर करावीत,” अशी मागणी करत शेलार यांनी एकाच कार्यक्रमासाठी दोन ठिकाणांहून बिल उकळण्याचा प्रकार चुकीचा असल्याचे म्हटले.
दरम्यान, उपाध्यक्ष धनाजी यमकर यांनी पत्रकार परिषदेत आरोपांना प्रत्युत्तर देताना, “फक्त आरोप करू नका, पुराव्यासह सिद्ध करा,” असे स्पष्ट केले. “निवडणूक आली की भ्रष्टाचाराचे आरोप होतात. हे केवळ फ्रस्ट्रेशनमधून केले जात आहेत,” असा पाटकर यांना त्यांनी टोला लगावला.
पाटकर यांनी फॉर्म कुणाकडे दिले, कुठे दिले आणि कुणाच्या हातात ठेवले याची माहिती आमच्याकडे असल्याचा दावा करत “फक्त आरोप करण्यापेक्षा संबंधितांची नावं घ्या,” असेही त्यांनी म्हटले. २०१५ नंतरच्या संचालकांविरोधात धर्मादाय आयुक्तांकडे हरकत घेतल्याचेही त्यांनी सांगितले.
महामंडळात ५० हजारांहून अधिक सदस्य असताना केवळ ३४०० जणांनाच मतदानाचा अधिकार असल्याचा मुद्दाही पत्रकार परिषदेत उपस्थित करण्यात आला. अंतिम उमेदवार यादी जाहीर झाल्यानंतर कोण कोणत्या पॅनेलमधून निवडणूक लढवणार हे स्पष्ट होणार आहे.