अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत मंत्र्यांच्या  पत्नीची एन्ट्री...अर्ज भरण्यावरून धुसपूस सुरु 

<p>अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत मंत्र्यांच्या  पत्नीची एन्ट्री...अर्ज भरण्यावरून धुसपूस सुरु </p>

कोल्हापूर - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या अर्ज छाननी वेळी मोठा वाद झाला आहे. काही दिग्गजांचे अर्ज अपात्र ठरवण्यात आल्याने हा वाद तापला आहे. 
 यावेळी अभिनेते विजय पाटकर यांनी, या निवडणुकीत राजकीय हस्तक्षेप होत असून मला उमेदवारी अर्ज भरू दिला गेला नसल्याचा आरोप केला आहे. या आरोपाला प्रत्युत्तर विद्यमान अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांनी दिले  आहे. यामुळे या दोघांमध्ये आरोप – प्रत्यारोप सुरु झाले आहेत तर दुसरीकडे  मंत्री उदय सामंत यांची पत्नी नीलम उदय सामंत यांनी अर्ज भरून निवडणुकीत एन्ट्री केली आहे. 
 नीलम उदय सामंत यांनी निवडणुकीत एन्ट्री केल्याने शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी, मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीमध्ये मंत्री उदय सामंत यांच्या पत्नी नीलम उदय सामंत यांची निवड व्हावी, यासाठी संपूर्ण सरकारी यंत्रणा कामाला लागली, असल्याचा आरोप केला आहे. भाजपकडून दडपशाही केली जातेय, याचं उत्तम उदाहरण ही निवडणूक असल्याची  टीका खा. सुप्रिया सुळे यांनी केली आहे.