‘या’ प्रकरणी RCC कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर सीबीआयच्या ताब्यात...

<p>‘या’ प्रकरणी RCC कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर सीबीआयच्या ताब्यात...</p>

पुणे – नीट पेपरफुटी प्रकरणी लातूरचे  प्रख्यात नीट क्लासचे संचालक शिवराज मोटेगावकर यांना सीबीआयने ताब्यात घेतले आहे. गेल्या 
तीन दिवसांपासून  सीबीआयकडून त्यांची चौकशी सुरु होती. तब्बल ११ तासांच्या चौकशीनंतर आज सीबीआयने मोटेगावकर यांना ताब्यात घेतले आहे.

नीट पेपरफुटी प्रकरणी लातूर येथील प्राध्यापक एस पी कुलकर्णी या प्राध्यापकाची मास्टर माईंड म्हणून माहिती समोर आल्यानंतर सीबीआयचे पथक लातूर येथे दाखल झालं होतं. शिवराज मोटेगावकर हे आरसीसी कोचिंग क्लासेसचे संचालक आहेत. त्यांच्या क्लासचे राज्यासह देशात शाखा आहेत.
मोटेगावकर यांच्या RCC क्लासमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थीनीची आणि तिच्या वडीलांची CBI कडून चौकशी केली जातं आहे. मोटेगावकर यांच्याकडून नीटचे प्रश्न आणि त्या प्रश्नांची उत्तरे ज्यांना मिळाल्याचा संशय आहे ते विद्यार्थी आणि पालक देखील सीबीआयच्या रडारवर आहेत.