थकीत 11 व 1 अनाधिकृत नळ कनेक्शनवर महापालिकेची कारवाई

<p>थकीत 11 व 1 अनाधिकृत नळ कनेक्शनवर महापालिकेची कारवाई</p>

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या शहर पाणीपुरवठा विभागामार्फत शहरातील पाणी बिल थकबाकीदार आणि अनाधिकृत नळ कनेक्शनधारकांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत आज कसबा बावडा येथील मातंग वसाहतीत कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान थकीत पाणी बिल न भरलेल्या 11 नळ कनेक्शनधारकांचे पाणी कनेक्शन तोडण्यात आले. तसेच 1 अनाधिकृत नळ कनेक्शनही खंडित करण्यात आले.

शहर व ग्रामीण भागातील मोठे थकबाकीदार तसेच अनाधिकृत नळ कनेक्शनधारकांविरोधात पुढील काळातही कारवाई सुरू राहणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. नागरिकांनी थकीत पाणी बिले तात्काळ भरून महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहनही विभागामार्फत करण्यात आले आहे.

ही कारवाई आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर व जल अभियंता हर्षजीत घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत शाखा अभियंता महानंदा सूर्यवंशी, मिटर रीडर गणेश देसाई, प्रवीण वरेकर, मुकुंद माने, महावीर आवळे, प्रितेश रणवरे तसेच भाग फिटर नितीन माने यांनी सहभाग घेतला.