पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर अपघात... कसबा आरळे येथील दोघांचा मृत्यू 

<p>पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर अपघात... कसबा आरळे येथील दोघांचा मृत्यू </p>

कोल्हापूर - सातारा येथील पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पहाटेच्या सुमारास मिनी बस आणि ट्रकची जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत.
करवीर तालुक्यातील कसबा आरळे येथील स्नेहल उत्तम कांबळे आणि एकनाथ बापू कांबळे या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.