निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेसला आग...
भोपाल – आज सकाळच्या दरम्यान मध्यप्रदेश राज्यातील रतलाम जिल्ह्यात थिरुवनंतपुरम-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेसला अचानक आग लागली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
एका एसीच्या डब्याला आग लागल्याने ही दुर्घटना घडली आहे. पश्चिम मध्य रेल्वे झोनच्या कोटा विभागातील लुनी रिच्छा आणि विक्रमगढ अलोट स्थानकांदरम्यान धावत असताना रेल्वेच्या ‘बी-१’ (B-1) डब्यात ही घटना घडली. डब्यातील सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले असून, कोणत्याही प्रवाशाला किंवा रेल्वे कर्मचाऱ्याला दुखापत झालेली नाही. आग लागलेला बी-१ डबा ट्रेनपासून वेगळा करण्यात आला आहे. रेल्वे कर्मचारी आणि अधिकारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले असून आग विझवण्याचे काम सुरू आहे.