उद्यापासून राज्यातील बहुतांश भागांत पावसाचा जोर कमी होणार... 

<p>उद्यापासून राज्यातील बहुतांश भागांत पावसाचा जोर कमी होणार... </p>

मुंबई - उद्यापासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर कमी होणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.  ही परिस्थिती किमान पुढील 10 दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. या दरम्यान राज्यातील विविध भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस अपेक्षित असून  राज्यातील कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. प्राथमिक अंदाजानुसार जुलै महिन्याच्या दुसऱ्या अर्ध्यात पहिल्या अर्ध्याच्या तुलनेत पावसाचे प्रमाण कमी राहू शकते. 
जुलैच्या सुरुवातीला मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली असली तरी राज्यातील विविध भागांमध्ये आतापर्यंत सरासरी पेक्षा कमी पाऊस पडला आहे.  विशेषतः खानदेश (धुळे आणि नंदुरबार जिल्हे), मध्य महाराष्ट्र (अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्हे), पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात कमी पाऊस झाला आहे.  

शेतकऱ्यांनी हवामानाच्या स्थितीनुसार शेतीचे नियोजन करावे. ⁠राज्यातील ज्या भागांमध्ये अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही, तिथे शेतकऱ्यांनी जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये, असे आवाहन राज्याच्या कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.