दरडी कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत ; 17 गाड्या रद्द...
मुंबई - सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे लोणावळा-करजत मार्गावर दरड कोसळली आहे. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. यासाठी रेल्वेच्या 17 गाड्या रद्द करण्यात आल्या असून 31 गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. तसेच 18 गाड्या अर्ध्या मार्गावर थांबविण्यात आल्या आहेत तर 15 गाड्या अर्ध्या मार्गापासून सुरू करण्यात येणार आहेत.
यामध्ये डेक्कन क्वीन, डेक्कन एक्स्प्रेस, इंद्रायणी एक्स्प्रेस, प्रगती एक्स्प्रेस, सिंहगड एक्स्प्रेस, इंटरसिटी एक्स्प्रेस आदींसह एकूण 17 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर कोणार्क एक्स्प्रेस, चेन्नई-सीएसएमटी, अहमदाबाद-पुणे, हजरत निजामुद्दीन-पुणे यासह 31 लांब पल्ल्याच्या गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.
याशिवाय काही गाड्या पुणे, लोणावळा, पनवेल, दौंड, खडकी, इगतपुरी, तळेगाव आणि कर्जत रेल्वे स्थानकावर थांबविण्यात आल्या आहेत.