लक्ष्मीपुरीत अंगारकी चतुर्थीनिमित्त 1501 आंब्यांची आकर्षक आरास...

<p>लक्ष्मीपुरीत अंगारकी चतुर्थीनिमित्त 1501 आंब्यांची आकर्षक आरास...</p>

कोल्हापूर – शहरातील लक्ष्मीपुरी येथे अंगारकी चतुर्थीनिमित्त धान्य व्यापारी सांस्कृतिक मंडळाच्या वतीने श्री वरदविनायकांची तब्बल 1501 आंब्यांची भव्य आकर्षक आरास करण्यात आली होती.
हिरवाईची सजावट, फुलांची आकर्षक मांडणी आणि आंब्यांच्या अनोख्या सजावटीमुळे लक्ष्मीपुरी परिसरात भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. या सजावटीसाठी मंडळाचे पदाधिकारी, सदस्य आणि व्यापारी बांधवांनी परिश्रम घेतले.