त्या नराधमाबाबत मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीत दिले निर्देश

<p>त्या नराधमाबाबत मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीत दिले निर्देश</p>

पुणे – नसरापूर येथील चिमुरडीवर अत्याचार करून हत्या केलेल्या प्रकरणाचे पडसाद कॅबिनेट बैठकीत उमटले आहेत. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, लैंगिक शोषण करणाऱ्या नराधमांना पॅरोल देऊ नका, असे निर्देश दिले आहेत.

लैंगिक प्रकरणातील आरोपी हे 80 ते 90 टक्के त्याच गुन्ह्यात अटक होऊन पॅरोलवर सुटलेले असतात आणि त्या काळात ते परत तेच गुन्हे करतात. 2014 ते 2019 या काळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अशा गुन्ह्यातील आरोपींना पॅरोल देऊ नका, असा कायदा केला होता. तो 2-3 वर्ष अस्तित्वात होता. पण कालांतराने तो न्यायालयाने रद्द केला. आता पुन्हा तसाच कायदा करा, असे निर्देश देवेंद्र फडणवीसांनी विधी व न्याय विभागाला दिले आहेत.