वनरक्षक प्रकाश शिंदे यांना 'शोधार्थ गौरव पुरस्कार' प्रदान

<p>वनरक्षक प्रकाश शिंदे यांना 'शोधार्थ गौरव पुरस्कार' प्रदान</p>

कोल्हापूर - शोधार्थ साप्ताहिकाच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त गडहिंग्लजचे वनरक्षक प्रकाश शिंदे यांना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल 'शोधार्थ गौरव पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले आहे. या  गौरव सोहळ्यावेळी  उपविभागीय अधिकारी एकनाथ कालबांडे, शोधार्थचे संपादक शिवाजी पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे चिटणीस शिवाजी खोत आदींची प्रमुख उपस्थिती होती.

वनरक्षक प्रकाश शिंदे यांनी अत्यंत धाडसी पावले उचलत गडहिंग्लज आणि चंदगड परिसरातील अवैध शिकार व लाकूड तस्करी रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. याशिवाय जिवंत बॉम्ब आणि प्राण्यांच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा छडा लावून गुन्हेगारांना जेरबंद केले आहे. त्यांच्या या प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठ कामगिरीमुळे वन विभागाची प्रतिमा उंचावली आहे.