शिंदे गटात प्रवेश करताच ‘या’ खासदाराच्या 18 कोटींच्या निधीला तात्काळ मंजुरी...
मुंबई - ठाकरे गटातील ६ बंडखोर खासदारांपैकी एका खासदाराने शिंदेंच्या गटात प्रवेश करताच आपल्या १८ कोटींच्या निधीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून तात्काळ मंजुरी मिळवून घेतली आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
सहा बंडखोर खासदारांपैकी धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी, विविध विकास कामाच्या निधींना मिळालेल्या स्थगितीच्या कामांना एकनाथ शिंदेंकडून तात्काळ मंजुरी मिळवली आहे. याबाबचा भेटीचा व्हिडीओ खा. ओमराजे निंबाळकर यांनी शेअर केला आहे. धाराशिव नगरपरिषद क्षेत्रातील विविध कामांसाठी हा निधी देण्यात आल्याची माहिती त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे.