तुकाराम मुंढे यांना ‘या’ पदावरून हटवले...
मुंबई – गेल्या काही दिवसांपासून अन्न, औषधे, दूध, खवा यासारख्या अनेक भेसळयुक्त पदार्थांविरोधात धडक कारवाई करणारे अधिकारी म्हणून जनतेत चर्चेत आलेल्या तुकाराम मुंढे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सध्या मुंढे यांच्याकडे अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाबरोबर परभणी जिल्ह्याचे पालक सचिव पदही आहे. यापैकी त्यांना परभणी जिल्ह्याच्या पालक सचिव पदावरून हटवण्यात आले आहे. या पदावर डॉ. चंद्रकांत फुलकुंडवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तुकाराम मुंढे यांनी गेल्या पंधरा- वीस दिवसात भेसळीविरोधात धडक मोहिम राबवायला सुरुवात केल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. अन्न, औषधे, दूध, खवा भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा बडगा उगारत अनेकांना जेलमध्ये त्यांनी पाठविले आहे.