भाजपने सहकार क्षेत्रात पक्षीय राजकारण आणू नये : माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर
कोल्हापूर – भाजपने सहकार क्षेत्रात पक्षीय राजकारण आणू नये. गोकुळ आणि केडीसीसी बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय मिळत असून, पक्षीय राजकारण बाजूला ठेवले तर अशा संस्था अधिक प्रभावीपणे चालू शकतील, असे वक्तव्य माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर यांनी एस न्यूजशी बोलताना केले.
विरोध संपवण्याऐवजी विरोधकांना संपवण्याचे काम सध्या सुरू आहे. विविध यंत्रणा आणि संस्थांचा वापर करून हुकूमशाही पद्धतीने कारभार चालवला जात असल्याचा आरोप सत्यजित पाटील-सरूडकर यांनी केला आहे. लोकशाहीचा गळा घोटला जात असून, जनतेचा उद्रेक झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांना वास्तवाची जाणीव होईल, असा इशारा त्यांनी दिला.
यावेळी खासदार फुटीबाबत बोलताना पाटील-सरूडकर यांनी, दीड वर्षांपूर्वी निष्ठावंत म्हणून सहा खासदारांना उमेदवारी देण्यात आली आणि जनतेनेही त्यांना निष्ठावंत म्हणून निवडून दिले. मात्र, पैशासाठी त्यांनी गद्दारी केली. जनता आजही उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचा दावा त्यांनी केला आहे.