गुरुवारी कोल्हापुरात उत्थान एम. एस. एम. ई महोत्सव होणार...

<p>गुरुवारी कोल्हापुरात उत्थान एम. एस. एम. ई महोत्सव होणार...</p>

कोल्हापूर - आय.सी.ए. आय, कोल्हापूर शाखा आणि एम.एस.एम.ई स्टार्ट अप कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापुरात गुरुवारी  उत्थान एम.एस.एम.ई महोत्सव होणार आहे. विविध घटकांना एकत्र आणून सामूहिक विकास साधने हा यामागील मुख्य उद्देश असल्याचे आय.सी.ए.आय शाखेचे अध्यक्ष आशिष सेवेकरी यांनी पत्रकार बैठकीत सांगितले.

उद्योग, व्यावसायिक बँका आणि शासन यांच्यातील समन्वय अधिक मजबूत करण्याचा या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार आहे. द पॅव्हिलियन हॉटेलच्या मधुसूदन हॉलमध्ये विविध शासकीय योजना, संधी, वित्तपुरवठा, गुंतवणूक, केंद्र आणि राज्य शासनाच्या अनुदान योजना, आदींविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यासह उद्योग क्षेत्रातील नेटवर्कच्या संधी, उद्योग वाढीसाठी नाविन्यपूर्ण उपाययोजना, पॅनल डिस्कशन आदीचे आयोजन करण्यात येणार आहे.

यावेळी प्रख्यात बिजनेस एक्सपर्ट सी.ए. चंदन लाहोटी हे "एमएसएमई क्षेत्रातील विविध व्यावसायिक संधी, "धनेश राळे हे "सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसमोरील समस्या आणि त्यावर मात करण्यासाठी व्यावहारिक उपाय, सी.ए. यतिराज मर्दा हे "केंद्र आणि राज्य शासनाच्या प्रोत्साहनपर योजना, अनुदानं आणि लाभ," सी.ए. नितीन हारगुडे हे" कर्ज घेताना सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना भेडसावणाऱ्या अडचणी" सिद्धार्थ पंडित हे "ब्रेंडिंग आणि व्यवसायाचा प्रभावी प्रचार कसा करावा" आदी विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत.

यावेळी आय.सी.ए.आय शाखेचे सचिव राघवेंद्र बकरे, शाखा व्यवस्थापक स्वप्निल सादळे उपस्थित होते.