राज्यात 12 वर्षांत ‘इतकी’ लाख झाडे तोडली : अधिवेशनात सरकारची कबुली 

<p>राज्यात 12 वर्षांत ‘इतकी’ लाख झाडे तोडली : अधिवेशनात सरकारची कबुली </p>

मुंबई – पावसाळी अधिवेशनावेळी काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राज्य सरकारने, सार्वजनिक उपक्रम म्हणून केलेल्या बांधकामांसाठी मागील 12 वर्षांमध्ये 5.30 लाख झाडे तोडण्यात आल्याची कबुली दिली आहे. 

तसेच महामार्गाच्या दुतर्फावर त्या बदल्यात 51.10 लाख झाडांची लागवड करण्यात आल्याचे सांगण्यात आले. कंत्राटदारामार्फत महामार्गाच्या दुतर्फा झाडांची लागवड केली जाते. तोडलेल्या वृक्षांच्या बदल्यात नवीन झाडे लावली असून काही ठिकाणी वृक्षलागवड पूर्ण केल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.