'तुमची बाजू मांडण्यासाठी तुम्ही आजच लोकसभा अध्यक्षांच्या समोर या' : ठाकरे गटाला आला निरोप
नवी दिल्ली - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सहा खासदारांनी बंडखोरी करत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
शिंदे गटाने 'ऑपरेशन टायगर' राबवल्यामुळे ठाकरे पक्षाच्या खासदारांची संख्या नऊ वरून फक्त तीनच राहिले आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ठाकरे पक्षाला भेटण्यासाठी बोलवले आहे. 'तुमची बाजू मांडण्यासाठी तुम्ही आजच लोकसभा अध्यक्षांच्या समोर या' असा निरोप देण्यात आला आहे. आज सायंकाळी 5 वाजता खासदार अरविंद सावंत आणि खासदार अनिल देसाई लोकसभा अध्यक्षांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे यावेळी बंडखोर खासदारांच्या गटाला परवानगी देऊ नका, अशी विनंती केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.