सरकारचा हा निर्णय मूर्खपणाचा : राजू शेट्टी 

<p>सरकारचा हा निर्णय मूर्खपणाचा : राजू शेट्टी </p>

कोल्हापूर – नुकताच मोदी सरकारने देशांतर्गत साखरेचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी साखर निर्यातीवर बंदी घातली आहे त्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे यावर माजी खासदार राजू शेट्टी यांनी, सरकारचा हा निर्णय मूर्खपणाचा आणि भंपकपणाचा, असल्याची टीका त्यांनी केली आहे. 
राजू शेट्टी यांनी म्हटले आहे कि, साखरेच्या निर्यातीवरची बंदी म्हणजे शेतकऱ्यांची अशी अवस्था झाली आहे की 'आई जेवू घालेना आणि बाप भीक मागू देईना'...चार वर्षे सरकारने एमएसपी न वाढवल्यामुळे साखरेचे दर स्थिर राहिले आहेत. स्वतः देखील भाव वाढवत नाही आणि परदेशात चांगला दर मिळत असेल तर त्याला देखील तुम्ही बंदी घालता.कारखानदार आणि आमचं भांडण आहेच पण साखरेला दर मिळाला नाही तर कारखानदार तरी काय करणार?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.