''त्या'' महिलेच्या व्हायरल व्हिडिओवर मिटकरींकडून मंत्री महाजनांना घरचा आहेर   

<p>''त्या'' महिलेच्या व्हायरल व्हिडिओवर मिटकरींकडून मंत्री महाजनांना घरचा आहेर   </p>

मुंबई –  महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत नामंजूर झाल्याने त्या विरोधात मुंबईतील वरळीत भाजपकडून मोर्चा काढण्यात आला.. यावेळी मोठी वाहतूक कोंडी झाल्याने  नागरिक, प्रवाशांना नाहक त्रास झाल्याचे पहायला मिळाले. यावेळी एक महिलेने चक्क मंत्री गिरीश महाजन आणि पोलिसांना चांगलंच सुनावले आहे. या महिलेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. यावर राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरी यांनी मंत्री गिरीश महाजन यांना सल्ला देत घरचा आहेर दिला आहे.  

अमोल मिटकरी  यांनी म्हटले आहे कि, इथं दिवंगत उपमुख्यमंत्री  अजित पवार आपल्याला लक्षात घ्यायला हवेत. पत्रकार त्यांना विचारायचे पहाटे कामाला सुरुवात का करता ? तर दादा सांगायचे यामुळे लोकांना ट्राफिक समस्या जाणवत नाही. आपल्यामुळे त्यांना त्रास होत नाही आणि कामे देखील लवकर होतात. मुक्कामाच्या ठिकाणी लवकर पोहचता येते. गिरीश महाजन यांनी तेवढा तरी अजित पवारांचा आदर्श घ्यावा,  असा सल्ला त्यांनी दिला आहे.