2006 च्या मालेगाव स्फोटाबाबत उच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय...आरोपींची झाली सुटका
मुंबई - 2008 च्या मालेगाव स्फोटातील सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर आता 2006 च्या मालेगाव स्फोटामधील चौघा आरोपींची मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.
२००६ साली मालेगावात झालेल्या चार स्फोटामध्ये ३१ जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी आरोपींविरोधात विशेष सत्र न्यायालयाने हत्या, गुन्हेगारी कट रचणे तसेच युएपीए अंतर्गत आरोप निश्चित केले होते. मात्र सत्र न्यायालयाच्या या आदेशाला आरोपींनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने राजेंद्र चौधरी, धान सिंह, लोकेश शर्मा आणि मनोहर नरवारीया या चौघा आरोपींचा खटला संपुष्टात आणत त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणेला प्रत्यक्ष घटना पाहिल्याचा दावा करणारा एकही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार सादर करता आला नाही, असा युक्तिवाद आरोपींच्या वकिलांनी केला आहे.